परिक्षण : कट्य़ार काळजात घुसली - सुबोध भावे आणि राहुल देशपांडे

नाटकाचे परिक्षण लिहिण्याइतके मला काही त्यातले कळते असे नव्हे, आपले मनात जे काही आले ते लिहिले एवढेच!

कट्यार चा मी बघितलेला हा दुसरा आविष्कार. पहिला प्रयोग रविंद्र खरे, डॉ. राम साठ्ये, चारुदत्त आफळे इ. मंडळींनी केलेला पाहिला होता. मूळ नाटक बघण्याचे भाग्य आपल्या पिढीला नाही, पण २ वेगळे संच हे नाटक समर्थपणे उभे करू शकतात हे पण आपल्या पिढीचे नशिब म्हणायचे! तर राहुल च्या नाटकाची तुलना आफळेंच्या नाटकाशी नकळत होणारच हे नमूद करते

राहुलच्या नाटकाची जमेची बाजू म्हणजे सर्व गायक अत्यंत ताकदीचे आहेत. राहुल (खाँसाहेब), महेश काळे (सदाशिव), दिप्ती माटे (झरीना), वेदश्री ओक (उमा) सगळेच उत्तम गाणारे! अभिनयाच्या बाबतीत मात्र सुबोध सोडल्यास सगळे थोडे uncomfortable वाटतात. राहुलने खाँसाहेब तसे चांगले उभे केले आहेत, पण एकूणच नाटक "फ़िरोदिया" mode मधून अजून बाहेर आल्यासारखे वाटत नाही.

गाण्यांबद्दल बोलायचे झाले तर राहुल चे "लागी कलेजवा कटार" उत्तम, पण "घेइ छंद " खूप जमले असे वाटले नाही. अर्थात प्रयोगा-प्रयोगा मध्ये फरक असू शकतो. सर्व गाणी म्हणताना २ घराण्यातील फरक उत्तम highlight झाल्यासारखे वाटले (आफळेंच्या प्रयोगात हे तितकेसे clear झाले असे वाटले नव्हते).
महेश चे "मुरलीधर श्याम..." अगदी एक नंबर! आणि शेवटी "सुरत पियाकि..." आणि तराणा पण मस्त!
दिप्ती आणि वेदश्री ची पण गाणी छान. चाँद, उस्मान साकार केलेल्या कलाकारांची नावे आठवत नाहीत, पण त्यांची पण गाणी लयी झ्याक!

अभिनयच्या बाबतीत, सुबोध एकदम छान, वेदश्री आणि दिप्ती पण impressive. महेश मात्र थोडासा अजुन uncomfortable वाटला. विशेषतः गाणी म्हणताना तो "सदाशिव" होऊन गाण्याऐवजी "महेश" म्हणूनच गातो आहे असे वाटले. सदाशिव चे initial bearing खूप  चांगले झाले त्याचे, पण नंतर खाँसाहेबांच्या बरोबरच्या प्रसंगामध्ये थोडा कमी पडल्यासारखा वाटला. गाण्याने अभिनयाला चांगलेच overpower केल्यासारखे वाटले. राहुल महेश पेक्षा जास्त comfortable वाटला, पण गाणे overpowering होते.

मूळ नाटकाची संहिता खूपच मोठी आहे. ते लहान करावे लागले असल्यामुळे कधी कधी तुटकपणा जाणवला. रागमालेचा scene राम साठ्ये आणि team नी फारच जास्त चांगला सादर केला होता. दिग्दर्शनाबद्दल बोलायचे तर काही प्रसंग खूप छान हाताळ्ले आहेत, जसे उमा "घेइ छंद.." गाताना निघून जाते, आणि नंतरचा खाँसाहेब व झरीना यांचा संवाद. पण शेवटचा सदाशिव च्या जाण्याचा प्रसंग जरा कमी convincing  वाटतो. सदाशिव आणि झरिना यांच्यातील प्रेम फ़क्त मूळ नाटक माहित असल्यानेच कळते :). तिथेही expression कमी पडल्यासारखे वाटते.

अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते, ती म्हणजे, हा संच जास्त आपला वाटतो. एक तर सर्व कलाकार वय वर्षे ३५ पेक्षा लहान आहेत. त्याबद्दल त्यांचे खूपच कौतुक आहे.  आणि दुसरे म्हणजे माझा बलमित्र महेश यात मध्यवर्ती भूमिकेत आहे!

सरतेशेवटी, संगीत नाटकाकडून काय अपेक्षा ठेवाव्यात हे कदाचित मला नीट कळले की नाही असे वाटते. म्हणजे उत्तम गायकांकडून उत्तम अभिनयाची अपेक्षा करणे हे रास्त की नाही हे माहित नाही. पण तसे झाले तर नाटक अधिक परीपूर्ण होइल हे निश्चित.

Comments

Popular posts from this blog

Guest Blog : About Indonesia by Shailendra Halbe

The Beautiful Kawah Putih and Bandung

Appreciation post : Songs of the River Ganga