परिक्षण : कट्य़ार काळजात घुसली - सुबोध भावे आणि राहुल देशपांडे
नाटकाचे परिक्षण लिहिण्याइतके मला काही त्यातले कळते असे नव्हे, आपले मनात जे काही आले ते लिहिले एवढेच! कट्यार चा मी बघितलेला हा दुसरा आविष्कार. पहिला प्रयोग रविंद्र खरे, डॉ. राम साठ्ये, चारुदत्त आफळे इ. मंडळींनी केलेला पाहिला होता. मूळ नाटक बघण्याचे भाग्य आपल्या पिढीला नाही, पण २ वेगळे संच हे नाटक समर्थपणे उभे करू शकतात हे पण आपल्या पिढीचे नशिब म्हणायचे! तर राहुल च्या नाटकाची तुलना आफळेंच्या नाटकाशी नकळत होणारच हे नमूद करते राहुलच्या नाटकाची जमेची बाजू म्हणजे सर्व गायक अत्यंत ताकदीचे आहेत. राहुल (खाँसाहेब), महेश काळे (सदाशिव), दिप्ती माटे (झरीना), वेदश्री ओक (उमा) सगळेच उत्तम गाणारे! अभिनयाच्या बाबतीत मात्र सुबोध सोडल्यास सगळे थोडे uncomfortable वाटतात. राहुलने खाँसाहेब तसे चांगले उभे केले आहेत, पण एकूणच नाटक "फ़िरोदिया" mode मधून अजून बाहेर आल्यासारखे वाटत नाही. गाण्यांबद्दल बोलायचे झाले तर राहुल चे "लागी कलेजवा कटार" उत्तम, पण "घेइ छंद " खूप जमले असे वाटले नाही. अर्थात प्रयोगा-प्रयोगा मध्ये फरक असू शकतो. सर्व गाणी म्हणताना २ घराण्यातील फरक उत्तम highl...